काय येतं डोळ्यासमोर? सुगंधी तेल, उटणं, खमंग फराळ, आकाशकंदील, पणत्या, फटाके, रांगोळी, नवीन कपडे, किल्ला, मित्र मैत्रिणी, नातेवाईक, आनंदाने भरलेलं घर आणि मन.. या चित्रात आजी आजोबा, आई बाबा, काका काकू, मामा मामी, भावंडं असे सगळे असतात. आपण सगळ्यांबरोबर असतो पण आपल्या बरोबर कोण असतं? कोण असायला हवं?
नेमका आणि अचूक प्रश्न… हे चित्र पूर्ण होतं ते, आपल्या जोडीदाराच्या आगमनाने! त्याच्या येण्याने या चित्राचे रंग अधिक गहिरे, उठावदार होतात, खुलतात. हा जोडीदार अनुरूप, मनासारखा हवा.. ते चित्र सदैव हसरं, खेळकर रहाण्यामागचं हे खरं गमक आहे. आणि त्यासाठी आम्ही आपल्या मदतीला तत्पर आहोत. कारण आम्ही कौटुंबिक जिव्हाळा जपणारी माणसं आहोत.
कुटुंब, नाती
आयुष्यभराची..
क्षणा क्षणांमध्ये
सौख्य भरणारी…
सणाचा आनंद
द्विगुणित करणारी..
दुःखावर हळूवार
फुंकर घालणारी…