सीमोल्लंघन..

दस-याच्या शुभमुहूर्तावर करायचं कार्य. शुभविवाह हे देखील एक प्रकारचं सीमोल्लंघनच.. दोन जीवांचं, दोन कुटुंबाचं .. पण साता जन्मांसाठी एकत्र येण्यासाठी केलेलं. नवरात्रीच्या जागरानी पवित्र, शक्तिने ओतप्रोत झालेलं.. घटाच्या सभोवताली वाढलेल्या पंचधान्यांच्या कोवळ्या, लुसलुशीत कोंभासारखं तरारून वाढण्यासाठी आसुसलेलं..
आई जगदंबेच्या आशिर्वादाने यंदाच्या लगीन सराईत चतुर्भुज होण्यासाठी आमच्या संस्थेत प्रेमाचं आमंत्रण

मुहूर्तघटिका गाठायाची
लगीनघाई हंगामाची..
विजयादशमी आनंदाची
भाग्यरूप सवे सोनियाची…